कॉफी. आणि...
कॉफीचा मग ओठांना लावण्याआधीच,तिचा मस्त सुगंध काहीतरी आत हलकेच जागं करत जातो... अगदी तसाच.. जसा पावसाच्या सरींनी दरवळणारा मातीचा गंध ,,येणाऱ्या आठवणींच्या वर्षावाची जाणीव करत असतो.......काय सांगायचे असते त्याला...? का मन चिंब भिजत असते आठवणींंच्या सुगंधात ..? एक वेगळीच आभा का दाटते मनात..?? कारण कॉफी च नातंच असतं एका हळव्या जगाशी बांधलेलं..रुजू पहिणारं नव नातं स्वीकारताना येणाऱ्या आनंदाच्या सरी झेलू पहाणारं !!!! खरंच कॉफीचा तो मस्त सुगंध जेंव्हा अलगद जवळ येतो नव्या जाणीवांचा बांध अलगद बांधला जातो ... छोटेसे टेबल सोबत कॉफीचे दोन मग... संध्याकाळचे किरमिजी किरण, त्यांचे जादुई वातावरण !!!! अलगद गुलाबी स्वप्नापरी ती.... सोबत त्याच्या नजरेची पावती! तू आणि मी....की तू तिथं मी ?????? मूक शब्दांची देवाणघेवाण... नजरेची साक्ष ती !!! नव्या जाणीवांच जग कस आपल्यातच रमलेलं...छोट्याशा शिडकाव्यानही टवटवून फुलणारं... कॉफीला म्हटलं तर चव थोडी कडवट च ! आजूबाजूच्या अर्थहीन, रूक्ष भावनांच जणू प्रतिकच..तरीही हळूवार संध्याकाळ ही...