कॉफी. आणि...

कॉफीचा मग ओठांना लावण्याआधीच,तिचा मस्त सुगंध काहीतरी आत हलकेच जागं करत जातो... अगदी तसाच.. जसा पावसाच्या सरींनी दरवळणारा मातीचा गंध ,,येणाऱ्या आठवणींच्या वर्षावाची जाणीव करत असतो.......काय सांगायचे असते त्याला...? का मन चिंब भिजत असते आठवणींंच्या सुगंधात ..? एक वेगळीच आभा का दाटते मनात..?? कारण कॉफी च नातंच असतं एका हळव्या जगाशी बांधलेलं..रुजू पहिणारं नव नातं स्वीकारताना येणाऱ्या आनंदाच्या सरी झेलू पहाणारं !!!! खरंच कॉफीचा तो मस्त सुगंध जेंव्हा अलगद जवळ येतो नव्या जाणीवांचा बांध अलगद बांधला जातो ...
छोटेसे टेबल सोबत कॉफीचे दोन मग...
संध्याकाळचे किरमिजी किरण,
त्यांचे जादुई वातावरण !!!!
अलगद गुलाबी स्वप्नापरी ती....
सोबत त्याच्या नजरेची पावती!
तू आणि मी....की तू तिथं मी ??????
मूक शब्दांची देवाणघेवाण...
नजरेची साक्ष ती !!!                
नव्या जाणीवांच जग कस आपल्यातच रमलेलं...छोट्याशा शिडकाव्यानही टवटवून फुलणारं...
कॉफीला म्हटलं तर चव थोडी कडवट च ! आजूबाजूच्या अर्थहीन, रूक्ष भावनांच जणू प्रतिकच..तरीही हळूवार संध्याकाळ ही कॉफीच्या सोबतीनच का जास्त उजळते..?? आठवणींच्या एकटेपणाला का कॉफीचीच साथ लागते ?अस काय आहे तिच्यात,जिच्या सोबत आठवणींंच्या सरी हळूवार गुंफल्या जातात...
खरं तर कडवट रुक्षता बाजूला सारुन जेंव्हा अलवार.. हळूवार भावनांचा गोडवा अलगद मिसळून जातो तेव्हाच नाही का हे असं हवहवस काही जन्माला येतं..थोड्या या अद्भुत जगाची ओढ हळूवार मनाला नक्कीच वाटते कारण अनाठायी पळण्याच्या या स्पर्धेत क्षण दोन विसाव्याचे हवेसे वाटतात.. स्वतः मध्ये रमण्यासाठी..स्वतः बरोबर असलेल्या गोड सोबतीने जग विसरण्यासाठी... कुणीतरी आहे आपलं,फक्त आपल्या च भावविश्वात जगण्यासाठी ही भावनाच किती हळवी आहे..
आणि कॉफीच्या सुगंधासोबत आठवणींच्या सरींचा पाऊस कधी कधी डोळ्यात उभा राहून कोसळू लागतो.. तर कधी शब्दांतून वर्षावू लागतो...
नको भिजवूस ना रे....
    तुझ्या आठवणींंच्या वर्षावात
मनातल्या भावना माझ्या
    डोळ्यात उभ्या राहतात !!!
किती लपवू तुला,
     खोल उराच्या तळाशी ?
चिंब ओल्या पापण्याआड
     तूच उभा असशी...!!!!!!
                निशा(माधुरी खेडकर)

Comments

Popular posts from this blog

साथ

पाऊस