Posts

Mood swing

               Mood swings      अवतीभवतीच्या जगात इतकी हरवून जातेस,वाटत कुणी अनोळखी अस्तित्वच बरोबर वावरतय.एरवी शंभर हत्तींच बळ घेऊन, येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करतेस, सगळ्यांना धीर देत पुढे जाण्याचा मार्ग शोधतेस.....आणि कधी कधी अशी स्वतःलाच हरवून जातेस...                                                                                        का गं असं ...?? माहीत आहे... आजच हे mood swing च वारं काही नव नाही तुझ्यासाठी.पण 'का' हा प्रश्न आलाच ना मनात ..? आत्तापर्यंत सगळ्यांच हवं नको पाहताना किती किती swings अनुभवलेस असे. असंख्य वेळा तुझ्या मनाची आंदोलने तुला हलवून गेली. स्त्रीत्वाचं लेणं लेऊन जन्माला आलीस.. पण त्याचे रडगाणे व्हावे ,असे कधीच वाटते नाही तुला.. आणि म्हणूनच तर, हिमतीनेच निभावलस सारं !!!   ...

कॉफी. आणि...

कॉफीचा मग ओठांना लावण्याआधीच,तिचा मस्त सुगंध काहीतरी आत हलकेच जागं करत जातो... अगदी तसाच.. जसा पावसाच्या सरींनी दरवळणारा मातीचा गंध ,,येणाऱ्या आठवणींच्या वर्षावाची जाणीव करत असतो.......काय सांगायचे असते त्याला...? का मन चिंब भिजत असते आठवणींंच्या सुगंधात ..? एक वेगळीच आभा का दाटते मनात..?? कारण कॉफी च नातंच असतं एका हळव्या जगाशी बांधलेलं..रुजू पहिणारं नव नातं स्वीकारताना येणाऱ्या आनंदाच्या सरी झेलू पहाणारं !!!! खरंच कॉफीचा तो मस्त सुगंध जेंव्हा अलगद जवळ येतो नव्या जाणीवांचा बांध अलगद बांधला जातो ... छोटेसे टेबल सोबत कॉफीचे दोन मग... संध्याकाळचे किरमिजी किरण, त्यांचे जादुई वातावरण !!!! अलगद गुलाबी स्वप्नापरी ती.... सोबत त्याच्या नजरेची पावती! तू आणि मी....की तू तिथं मी ?????? मूक शब्दांची देवाणघेवाण... नजरेची साक्ष ती !!!                  नव्या जाणीवांच जग कस आपल्यातच रमलेलं...छोट्याशा शिडकाव्यानही टवटवून फुलणारं... कॉफीला म्हटलं तर चव थोडी कडवट च ! आजूबाजूच्या अर्थहीन, रूक्ष भावनांच जणू प्रतिकच..तरीही हळूवार संध्याकाळ ही...

सखी

                  सखी कशी असावी सखी....         मनात माझ्या रुंजणारी !!! गहिरे साद तिचे         संवाद हळुवार मनाचा!! स्वप्नात ही देई साद ती...          सत्यातील अलगद रेशीम वारा... स्वप्न नव्हे... भास नव्हे...          सखी तू माझे विश्व नवे!!!                                       -निशा

साथ

साथ हातात हात घालून नजरेची साथ घेऊन स्वप्नांच्या आभाळात पंख पसरविले तीने आपले ताकद कितीशी पंखात....  आकाश किती ते मोठे येणाऱ्या वावळटीला तोंड देईल ती कसे....? स्वतःला हरवून जाताना पाऊस वाऱ्याच्या वादळात कुठेतरी ती एकटीच घुसमटेल का या जगात..? खरंच का ती होती एकटी, लढाई का तिची एकाकी...?  नाही नाही...............  तिची साथ तिलाच  बळ हत्तीचे देई !!!! आणि म्हणूनच आभाळच क्षितिज तिला  पुन्हा पुन्हा खुणावत राही!!!!!!!!                                                                                          निशा                      

पाऊस

पाऊस पावसाधीची ती आतुरता काळ्या मेघांची ती नभातली दाटी डोळ्यात प्राण आणून त्याच्या येण्याची बघितलेली वाट! का आवडतो पाऊस तिला...? त्याचं भरभरून कोसळणे का आवडे तिला...? कारण... कारण तो नुसताच येत नाही साऱ्या आसमंतला कडाडून सांगत रहातो भेटण्याची ओढ!! विजांच्या चमचमातून दिसत रहाते त्याची आतुरता.... आणि तिची घालमेल थांबवण्या चाहुबाजुनी येतो तो, घेऊन सरींचा नजराणा!!! अखंड त्याचें कोसळणे अलगद तिच्या मिठीत शिरणे, प्रत्येक कणाकणात त्याच ते सामावणे.... सृजनाचा हा नियमच भरभरून त्याच ते  देणं... अवनी च्या मनातला आनंद हिरवागार दिसे आसमंत!!!!                                   निशा