साथ
साथ
हातात हात घालून
नजरेची साथ घेऊन
स्वप्नांच्या आभाळात
पंख पसरविले तीने आपले
नजरेची साथ घेऊन
स्वप्नांच्या आभाळात
पंख पसरविले तीने आपले
ताकद कितीशी पंखात....
आकाश किती ते मोठे
येणाऱ्या वावळटीला
तोंड देईल ती कसे....?
स्वतःला हरवून जाताना
पाऊस वाऱ्याच्या वादळात
कुठेतरी ती एकटीच
घुसमटेल का या जगात..?
खरंच का ती होती एकटी,
लढाई का तिची एकाकी...?
नाही नाही...............
तिची साथ तिलाच
बळ हत्तीचे देई !!!!
आणि म्हणूनच
आभाळच क्षितिज तिला
पुन्हा पुन्हा खुणावत राही!!!!!!!!
निशा
Comments
Post a Comment