पाऊस

पाऊस
पावसाधीची ती आतुरता
काळ्या मेघांची ती नभातली दाटी
डोळ्यात प्राण आणून
त्याच्या येण्याची बघितलेली वाट!
का आवडतो पाऊस तिला...?
त्याचं भरभरून कोसळणे
का आवडे तिला...?
कारण... कारण
तो नुसताच येत नाही
साऱ्या आसमंतला कडाडून
सांगत रहातो भेटण्याची ओढ!!
विजांच्या चमचमातून
दिसत रहाते त्याची आतुरता....
आणि तिची घालमेल थांबवण्या
चाहुबाजुनी येतो तो,
घेऊन सरींचा नजराणा!!!
अखंड त्याचें कोसळणे
अलगद तिच्या मिठीत शिरणे, प्रत्येक कणाकणात
त्याच ते सामावणे....
सृजनाचा हा नियमच
भरभरून त्याच ते  देणं...
अवनी च्या मनातला आनंद
हिरवागार दिसे आसमंत!!!!

                                  निशा

Comments

Popular posts from this blog

साथ

कॉफी. आणि...